Term Insurance Meaning in Marathi- टर्म इंश्योरेंस विषयी संपूर्ण माहिती.

Term Insurance Meaning in Marathi



आपल्या कुटुंबाचे भविष्य secure करण्यासाठी तुम्हाला term insurance घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही terms life insurance किंवा term insurance खरेदी करतात. तेव्हा, तुम्हाला term insurance चा अर्थ माहिती असणे आणि समजणे महत्वाचे आहे. त्यासोबतच आपल्या परिवारास आणि आपणास कोणता प्लान चांगला आहे. हे समजणे देखील गरजेचे आहे. उदा. आपल्याद्वारे घेतला गेलेला term insurance चा लाइफ कवर नियमित खर्च, मुलांचा शैक्षणिक खर्च, आणि इतर लागणार्या खर्चासाठी पुरेसे असायला हवा. हे सर्व तुम्हाला कळावे ह्यासाठी आम्ही term insurance meaning in Marathi ह्या लेखात term insurance म्हणजे काय? आणि, term insurance ह्या विमाविषयी माहिती पाहणार आहोत.

 


 

Term Insurance Meaning in Marathi- टर्म इंश्योरेंस विषयी संपूर्ण माहिती.




term insurance म्हणजे काय?

 

Term insurance हा जीवन विमा पॉलिसी (आयुर्विमा) चा एक प्रकार आहे. जो जीवनाच्या अनिश्चिततेविरुद्ध आर्थिक सुरक्षितता प्रदान करतो. आपल्या द्वारे खरीदले गेलेले term insurance प्लानच्या आधारे; पॉलिसी कालावधी दरम्यान आपला अकाळी मृत्यू झाल्यास, आपल्या कुटुंबास सम एशोर्ड (विमा राशि) मिळते. आणि, आपल्या गैर-उपस्थितीत आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीस तोंड देण्यास मदत करतो.

 

 








Benefits of Term insurance in Marathi-


आता तुम्हाला माहिती मिळाली असेल की, term insurance काय आहे? आता ह्या insurance चे काही benefits आपण पाहुयात-

 



 

जीवनावर संकट आल्यास परिवारस आर्थिक आधार-          

आपल्या कुटुंबात कमाई करणारे तुम्ही एकटे व्यक्ति असाल, , एक term life insurance द्वारे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या मृत्यूचा दुर्दैवी स्थितीचा सामना करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक नुकसानीविरुद्ध त्यांना सुरक्षित करण्यासाठी आपण मदत करू शकतात. आपल्या परिवारस चिंता-मुख्त आर्थिक भविष्य देण्यासाठी ही पॉलिसी आपणास सक्षम करते. आपण सहजपणे ह्या टर्म लाइफ इन्शुरेंस प्लान च्या अंतर्गत छोटे प्रीमियम देऊन एक महत्वपूर्ण लाइफ कवर घेऊ शकतात.

 


क्रिटिकल इलनेस (गंभीर आजार) असल्यास त्यासाठी कवर


आपल्या 20 ते 30 वर्षाच्या काळादरम्यान आपणास वाटू शकते की, आपणास कॅन्सर किंवा kidney faillur ह्या सारखे गंभीर आजार होणार नाही. असो, जर असे आजार आपल्याला जळल्यास आपले स्वास्थ तर खराब होतेच, त्यासोबच आजारासाठी आवश्यक उपचार घेण्यासाठी आपल्या मेहनतीने केलेली सेविंग्स देखील काही काळातच संपून जाते. त्यासाठी टर्म इंश्योरेंस प्लान डेथ बेनिफिट हे फायद्याचे ठरते.   क्रिटिकल आजारामुळे हे लाइफ insurance चे कवरेज वाढवून देते. असे critical इलनेस (गंभीर आजार) चे रायडर (अतिरिक्त फायद्याचे कवरेज) आपल्या insurance सोबत जोडल्यास त्याचे काही benefits आपल्याला पॉलिसी सोबत भेटते. रायडर अंतर्गत कोणताही आजार झाल्यास, आजाराच्या उपचारासाठी आपल्या परिवारास होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक नुकसानीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला एक रक्कम दिली जाते.  

 



 एक्सीडेंटल डेथ किंवा डिसेबिलिटी (दुर्घटनात्मक मृत्यु किंवा विकलांगता)

 

दुर्घटना ही केव्हाही आणि कुठेही होऊ शकते. गंभीरतेच्या आधारावर, आपल्या इलाज च्या खर्चासाठी आणि इन्कम मध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी तुम्हाला महत्वपूर्ण रकमेचे आवश्यकता असू शकते. एक्सीडेंटल डेथ किंवा डिसेबिलिटी रायडर सोबत term insurance प्लान असल्यास तुम्हाला अशा अडचणीवर मात करण्यात मदत मिळू शकते.

 


जोइंट मध्ये पॉलिसी घेऊ शकतात.

 आपण जर प्रीमियम चा खर्च कमी करू शकत असाल तर, त्यासाठी term प्लान आपणास जोइंट मध्ये पॉलिसी घेण्यासाठी देखील सुविधा देतो. ह्यात पति पत्नी हे दोघे एकाच पॉलिसीचा देखील भाग राहू शकतात. म्हणजे एकाच प्रीमियमवर दोन्ही इन्शोर्द राहू शकतात. ह्यासाठी काही terms and conditions देखील राहू शकतात.

 


जर तुम्हाला term insurance meaning in marathi हे लेख आवडत असेल तर, ह्यास नक्की शेअर करा. आणि  इतरांना ही ह्याचा फायद्याविषशी सांगा. 


एका पेक्षा जास्त नॉमिनी आपण बनवू शकतो

Term प्लान मध्ये आपल्याकडे एकापेक्षा जास्त नॉमिनी तयार करण्याची सुविधा असते. उदा. पति आपल्या पत्नी वर आधारीत आई-वडिलांस क्लेम नॉमिनी बनवू शकतो. आणि इंश्योर्ड अमाउंट दोन भागात वाटू शकतो.

 


टर्मिनल इलनेस बेनिफिट

काही टर्म प्लान हे टर्मिनल इलनेस बेनिफिट देखील देत असतात. ह्या बेनिफिट द्वारे इंश्योरेंस घेणार्‍या व्यक्तीस जकाही गंभीर आजार झाल्यास, ज्यामुळे तो जीवनाच्या शेवटच्या स्टेज वर असल्यास, इंश्योरेंस कंपनी उसकी त्याच्या मृत्यूच्या अगोदरच इंश्योरेंस कवर चा काही हिस्सा देऊ करून देते. .

 


प्रीमियम वापस घेऊ शकण्याचा प्लान

जर तुम्ही देय केलेले प्रीमियम प्लान परत मागू इच्छित असाल तर, आपण प्रीमियम रिटर्न प्लान घ्यावा लागतो. ह्यात इंश्योरेंस घेणारा व्यक्ति term पूर्ण होण्यापर्यंत जीवंत असेल तर कंपनी प्रीमियम परत करते. परंतु ह्या प्लानद्वारे मिळणारी रक्कम ही टर्म प्लान पेक्षा कमी राहते.

 

 

 

 

 

 

 





 

Faq about Term Insurance Meaning in Marathi.

 

Term insurance पॉलिसी कशाप्रकारे खरेदी कराल?

आता तुम्हाला term insurance म्हणजे काय? आणि, term insurance चे किती महत्व आहे, हे कळले असेल. ह्या सोबतच आपल्या साठी गरजेच्या टर्म इन्शुरेंस प्लानविषयी माहिती असणे आणि विस्तारानुसार रिसर्च करणे देखील महत्वाचे आहे.

टर्म insurance प्लान रिसर्च करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

 

1) आपले आणि परिवाराच्या आर्थिक गरजेचे मूल्यांकन करा.

2) टर्म इन्शुरेंस पॉलिसीच्या प्रीमियम रकमेचा अंदाज करा.

3) क्लेम सेटलमेंट रेशो: ची माहिती काढा.

4) अतिरिक्त कवरेज प्राप्त करण्यासाठी रायडर निवडा.

 

 

टर्म इन्शुरेंस प्लान घेतेवेळी मेडिकल चेकअप का करावा?

टर्म इन्शुरेंस घेतेवेळी मेडिकल चेकउप करणे गरजेचे आहे. कारण, आपल्या मेडिकल कंडिशनच्या आधारावर आपल्या पॉलिसीच्या  प्रीमियम रकमेत बदल होऊ शकतो.

 

टर्म इन्शुरेंस कोणी खरेदी करावा?

तुमचे वय 18 किंवा 65 वर्षे असो. जर, तुमचे कुटुंबाचा आर्थिक आधार तुमच्यावर अवलंबून असल्यास तुम्ही नक्कीच टर्म इन्शुरेंस घेतले पाहिजे. तुम्ही कमवायचे सुरू केल्यास नक्कीच हयाविषयी विचार करा.

 

 

 

 

 

 

 

Previous
Next Post »