Bank Information in Marathi
बँकेची माहिती (bank information in marathi):- नमस्कार मित्रांनो, ह्या लेखात आपण बँकविषयी माहिती पाहणार आहोत. ह्यात
आपण GOOGLE वर search केल्या जाणार्या–
bank information in Marathi, bank in Marathi, bank meaning in Marathi, बँक म्हणजे काय?, सहकारी बँक म्हणजे काय? अशा प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. चला तर पाहुयात.
Bank meaning in Marathi -बँक म्हणजे काय?
बँक ही अशी वित्तीय संस्था आहे जी, जनतेकडून धनराशि (रक्कम) जमा करून सुरक्षित
ठेवणे. तसेच, जनतेला गरजेच्या वेळी कर्ज देण्याचे काम करते.
bank in marathi
लोक त्यांच्या पैशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने
किंवा त्यांच्या पैशात व्याजाद्वारे वाढ होण्यासाठी बँकेमध्ये पैसे जमा करतात, आणि आवश्यकतेनुसार वेळोवेळी पैसे काढून घेतात.
बँक हेच पैसे व्यापारी किंवा इतर ज्याला
कोणालाही कर्जाचे गरज असेल, अशा व्यक्तीस कर्ज
देऊन व्याजाद्वारे पैसे कमावतता.
कर्ज देणे आणि जमा केलेली रक्कम
ठेवण्याव्यतिरिक्त, बँक इतर काम देखील
करते. जसे, लोकांचे दागिने तसेच इतर
मौल्यवान वस्तु सुरक्षेततेसाठी जमा ठेवणे, ग्राहकांसाठी
त्यांचे चेक गोळा करणे, व्यावसायिक बिलांत सूट देणे, ग्राहकांच्या आर्थिक स्थिति बद्दल गुप्तीने माहिती घेणे. अशा प्रकारचे
कार्य देखील बँक करते.
Bank definition in Marathi - बँकेची व्याख्या
भारतीय बँकिंग कंपनीच्या अधिनियम
१९४९ बँकेची व्याख्या:- कर्ज देणे आणि विनियोगासाठी सामान्य जनतेकडून रक्कम जमा
करणे आणि चेक, मसूदा किंवा आदेशानुसार
रकमेचे भुगतान करणे. ह्याला, बँकिंग व्यवसाय म्हणतात आणि हा
व्यवसाय करणार्या संस्थेस बँक असे म्हणतात.
बँकेचा इतिहास
प्रथम आधुनिक बँक हे इटली मधील
जेनोवा ह्या शहरात सन १४०६ मध्ये स्थापित करण्यात आले होते. ह्या बँकेचे नाव बैंको दि सैन जिओर्जिओ (सेंट जॉर्ज बैंक) असे होते.
इसवी सनाच्या दोन हजार वर्षांपूर्वी देखील कर्ज देण्याची
प्रथा होती. बँकिंगच्या इतिहासात असीरियन आणि बॅबिलोनियन ह्या संस्कृतीत व्यापर्यांना मंदिराच्या साधनांनी कर्ज देण्याचे
दिल्याचा सर्वात जुना उल्लेख आढळला आहे.
बँकेचे प्रकार
1) Commercial bank
व्यापारी बँक म्हणजे काय?
व्यापारी बँक ही व्यापारी
संस्थेसारखी, लाभच्या
दृष्टीने कामे करतात. “ऑक्सफोर्ड” च्या शब्धकोशात व्यावसायिक बँकेची व्याख्या – ‘ग्राहकांच्या आदेशानुसार
त्यांचे पैसे सुरक्षित ठेवणे किंवा आदेशानुसार पैसे खात्यातून काढून देणे’ अशी आहे. ह्या बँका जनतेकडील पैसे इतर गरुजूंना कर्ज
देऊन व्याजद्वारे पैसे कमावतात.
*organization of commercial bank
संस्थेच्या दृष्टीने व्यापारी बँका दोन भागांत विभागली जातात:
i) unit bank यूनिट बँक
ह्या व्यापारी बँक प्रकारात एकच बँकेचा एकच कार्यकाळ असतो. तसेच काही विशेष
भाग सोडून इतर ठिकाणी यूनिट बँकेच्या शाखा नसतात. यूनिट बँकेची प्रणाली अमेरिकेत
अधिक पसंद केली जाते.
ii) branch bank शाखा बँक
ह्या प्रकारात एकाच बँकेची अनेक शाखा संपूर्ण देशात पसरलेली असते. ह्या
प्रकारची बँक भारत, क्रास, जर्मनी, कॅनडा ह्या देशांत आहेत.
2. औद्योगिक बँक Industrial bank
आधुनिक युग हे औद्योगिकीकरणाचे युग आहे. ह्या युगात नव-नवीन उद्योग निर्माण
होत आहेत. ह्या उद्योगांची चालना मिळण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्यांना कर्ज
प्रदान करण्यासाठी अशा औद्योगिक बँकेची स्थापना करण्यात आली. ह्यामुळे उद्योग
वाढीस चालना मिळते.
3) कृषि बँक agriculture bank
कृषि बँकेची प्रक्रिया इतर बँक जसे उद्योग, व्यापार आणि वाणिज्य प्रकारच्या कार्ये पेक्षा वेगळे असतात. ह्यामुळे
ह्या नवीन बँक प्रकार निर्माण झाला.
कृषि बँकेचे प्रकार:-
i) कृषि सहकारी बैंक || सहकारी बँक म्हणजे काय?
(Agricultural Co-Operative Banks):
सहकारी बँक हे कमी कालावधी आणि कमी व्याजावर पैसे देतात.
ii) भूमी विकास बँक
ह्या प्रकारचे बँक हे दीर्घ कालावधीसाठी अर्थात 5 ते 20
वर्ष कालावधीसाठी जमीन गहाण घेवून कर्जे देतात.
4. विदेशी विनिमय बैंक
विदेशी विनिमय बँक हे केवळ विदेशी व्यापारासाठी कर्ज देऊ
करतात. जेव्हा विदेशात व्यापार करण्यात चलन अदलाबदल करण्याची वेळ येते तेव्हा ह्या
बँक ह्यात मदत करतात.
5. केंद्रीय बँक
आधुनिक बँक व्यवस्थेत केंद्रीय बँकेचे अधिक महत्व आहे.
ह्या बँकेची स्थापना देशातील बँक व्यवस्था नियंत्रित आणि नियमित करण्यासाठी केली गेली
आहे.
6. आंतरराष्ट्रीय बँक
ह्या प्रकारच्या बँकेची स्थापना आंतरराष्ट्रीय स्तरावर
आर्थिक समस्या सुधारण्यासाठी करण्यात येते. ह्या बँका सदस्य देशांना अल्पकाळात आर्थिक
पुरवठा करण्यात मदत करतात.
7. बचत बँक
आर्थिक दृष्टीने कमी इन्कम असलेल्या व्यक्तींसाठी ह्या
प्रकारच्या बँकेची स्थापना केली जाते. ह्या बँका बचत वाढवण्यासाठी ग्राहकांना अनेक
प्रकारच्या सुविधा प्रदान करतात.
ConversionConversion EmoticonEmoticon