Kyc Meaning In Marathi | kyc full form in Marathi
जेव्हा तुम्ही तुमचे नवीन बँक खाते उघडता तेव्हा तुम्हाला ते खाते उघडल्यानंतर काही दिवसांनी केवायसी करणे आवश्यक आहे. असे, बंकेकडून सांगितले जाते. तेव्हा तुम्हाला नक्की प्रश्न पळत असणार की, केवायसी म्हणजे नक्की काय असते? KYC करते वेळी तुम्हाला KYC म्हणजे काय? आणि, kyc करणे का जरुरीचे असते ह्याविषयी कळणे गरजेचे आहे. ह्यासाठी आम्ही Kyc Meaning In Marathi | kyc full form in Marathi ह्या लेखात Kyc विषयी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात!
Kyc Meaning In Marathi | kyc full form in Marathi
Kyc म्हणजे काय? Kyc Information in marathi
केवायसी विषयी सर्वांना प्रत्येक व्यक्तीस माहिती असले
पाहिजे. केवायसी ह्या शब्दाचा उपयोग बँक, मोबाईल किंवा सरकारी सेक्टर मध्ये
करण्यात येतो. Kyc मध्ये ग्राहकांविषयी काही माहिती असते जी बँक, संस्था किंवा
इतर फायनॅन्स सेक्टर मध्ये मागितली जाते.
KYC ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे
सर्व कंपन्या, बँक, वित्तीय संस्था आणि काही सरकारी योजनेत केली जाते. KYC
प्रक्रियेद्वारे ग्राहकांच्या ओळखीसाठी लागणारे कागतपत्रे जमा केले जातात.
प्रत्येक ग्राहकाने दिलेल्या कागदपत्रात ग्राहकाचे नाव, पत्ता, आणि
ओळखपत्राद्वारे ग्राहकासंबंधित संपूर्ण माहिती उपलब्ध असते. जर भविष्यात एखाद्या
ग्राहकास काही तक्रार, अडचणी किंवा ग्राहकास काही दुर्घटना झाल्यास ग्राहकाची ओळख
सहजतेने केली जावी ह्यासाठी Kyc प्रक्रिया केली जाते.
Kyc full form in Marathi
Kyc चा फूल फॉर्म ‘know Your Costumer’ असा होतो.
ह्याचा मराठीमध्ये अर्थ हा ‘आपल्या ग्राहकाविषयी जाणून घ्या’ असा होतो. Kyc करणे
प्रत्येक क्षेत्रातील संस्थेसाठी महत्वाचे आहे. kyc करतांना आधार कार्ड, पॅन कार्ड, पासफोर्ट, मतदान कार्ड इत्यादींची माहिती दिली जाते.
eKyc Meaning In Marathi | ekyc
म्हणजे काय?
KYC चा अर्थ हा ‘know your costumer’ असा होतो. ग्राहकाच्या ओळखीचा पुरावा मिळवा म्हणून kyc केली जाते.
हीच kyc इलेक्ट्रॉनिक स्वरुपात केल्यास त्याला e-KYC (electronic kyc)
म्हणतात.
e KYC चा फुल फॉर्म Electronic Know Your Customer असा आहे. म्हणजेच, ग्राहकाची
इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पद्धतीने ओळख पडताळणे. खरंतर ही आधीच चालू असलेल्या
तुमच्या ग्राहक kyc प्रक्रियेची डिजिटल आवृत्ती आहे जी कागदपत्रांच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक
उपकरणांच्या मदतीने पूर्ण केली जाते. आधार ई केवायसी ही भारतातील सर्वात लोकप्रिय kyc प्रक्रिया आहे.
तांत्रिकदृष्ट्या, e KYC विविध माध्यमांचा वापर
करून केली जाते, जसे Biometric Device द्वारे अंगठ्याचे किंवा बोटांचे प्रिंट
घेणे, आवाज match करणे इत्यादी.
आधार ई केवायसी: आधार ईकेवायसी ही भारतातील ई केवायसीची
सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. आधीच वापरात असलेल्या सर्व कागदपत्रांच्या जागी केवळ
केवायसीसाठी आधार ई केवायसी पुरेसे मानले जाते (काही विशेष प्रकरणांना वगळता).
तुमचा फोटो, तुमची वैयक्तिक ओळख, तुमचा पत्ता, तुमची
जन्मतारीख, तुमचा कोणाशी संबंध, मोबाईल, ईमेल, सर्व माहिती
ज्याची पुष्कळ स्वतंत्र कागदपत्रांद्वारे पुष्टी केली गेली होती; आता eKYC च्या मदतीने
फक्त एका आधारची पडताळणी करता येते.
सरकार सर्व प्रकारच्या सरकारी लाभ योजना आणि इतर
प्रक्रियांमध्येही आधार अनिवार्य करत आहे. सरकारी आणि खाजगी योजना आणि
प्रक्रियांमध्ये त्याचा वाढता कल पाहता, लोकं Aadhar ekyc लाच eKYC म्हणून जाणू
लागले आहे.
what is cKYC? सीकेवायसी म्हणजे काय?
cKYC चा अर्थ ‘Central Know Your Customer” असा होतो. केवायसी देशातील प्रत्येक प्रमुख संस्थांमध्ये केली जाते. केंद्रीय स्तरावर होणार्या kyc प्रक्रियेला cKYC म्हटले जाते. cKYC चा वापर विमा कंपन्या, म्युच्युअल फंड कंपन्या आणि एनबीएफसी इत्यादी करतात. cKYC ची नोंदणी केंद्रीय स्तरावर केली जात असल्याने देशातील सर्व नागरिक जे त्यांचे आर्थिक व्यवहार केंद्रीय स्तरावर करतात. त्यांची नोंद केंद्रीय स्तरावर ठेवली जाते. या नोंदी ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे, वित्तीय संस्था कोणत्याही ग्राहकास गरजेच्या वेळी ओळखू शकतात.
Difference between KYC and eKYC in Marathi- KYC आणि eKYC मधील फरक
eKYC ही प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्याद्वारे केली जाते. नॉर्मल
KYC प्रक्रियेत जास्त कागदपत्राच्या आधारे केली जाते. ह्यात वेळेही खूप लागतो. काही
वेळेस ह्या कागदपत्रांना गोळा करण्यात एक ते दीड महिना देखील लागतो. परंतु, eKYC ही प्रक्रिया काही
मिनिटांत होत असल्याने eKYC लोकप्रिय आहे. ह्यासाठी फक्त आधारकार्डची गरज असते. नॉर्मल KYC करताना डॉक्युमेंट
बनवणे आणि फोटोकॉपी तयार करणे ह्यासाठी खर्च लागतो. परंतु, eKYC प्रकिया कमी खर्चात
होऊन जाते. Aadhar eKYC करतांना कागदपत्र दुसर्या कोणालाही दिले जात नाही. त्यामुळे
kyc करण्यात गडबड होत नाही. नॉर्मल kyc करतांना लाभार्थी व्यक्ति
सोडून कोणादुसर्या व्यक्तीस सेवा दिली जाण्याची संभावना देखील असते. तसेच खोटे हस्ताक्षर
करून कामे करवून घेण्याची शक्यता असते.
KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे- Documents Required for kyc in Marathi
भारत सरकारने ओळखीचा पुरावा तयार करण्याच्या हेतूने काही
कागदपत्रे 'अधिकृतपणे वैध दस्तऐवज' म्हणून
अधिसूचित केली आहेत. जरी तुम्ही आधीच एकदा KYC दस्तऐवज
सबमिट केले असले तरीही बँका पुन्हा विचारू शकतात.
KYC फॉर्म भरण्यासाठी ग्राहकांना पुढील कागदपत्रांची गरज असते.
1) फोटोग्राफ – व्यक्तीच्या चेहर्याचा
स्पष्टपणे ओळखला जावा ह्यासाठी रंगीत आणि स्पष्ट पासपोर्ट साइजचा फोटो.
2) ओळखपत्र (identity proof)- व्यक्ति
जसे आपले नाव किंवा वैयक्तिक ओळख सांगत आहे. त्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र म्हणजेच
identity proof घेतले जाते. आवश्यक identity proof पूढीलप्रमाणे:-
2. आधार कार्ड
3. चालक परवाना (ड्राइविंग लाइसेंस)
4. मतदार ओळखपत्र (voter ID card)
5. बँक पासबूक
6. पॅन कार्ड
7. फोटोग्राफ
3) पत्त्याचा पुरावा (address proof):- ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला यापैकी एक कागदपत्र सादर करावे लागेल. जर identity proof मध्ये देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये तुमच्या पत्त्याचा तपशील असेल, तर तो 'पत्त्याचा पुरावा' म्हणून स्वीकारला जाईल. आणि जर कोणत्याही identity proof मध्ये नावाव्यतिरिक्त वर्तमान पत्ता नसेल तर खालीलपैकी एक दस्तऐवज सोबत जोडावा लागतो.
1. युटिलिटी बिल, कोणत्याही सेवा प्रदात्याकडून (वीज, टेलिफोन, पोस्टपेड सेल फोन, गॅस पाइपलाइन, पाणी बिल) बिल हे दोन महिन्यांपेक्षा जुने नसावे.
2. बँकेद्वारे स्वाक्षरी पडताळणीसह मेल किंवा
कुरियरद्वारे प्राप्त बँक खात्याचा तपशील. (bank Statement)
3. रेशन कार्ड
4. मालका व्दारे दिलेले नियुक्तीपत्र
5. जमीन पावती (कर्जाचे पुस्तक) किंवा
नगरपालिका कर.
4) जन्मदिनांकचा पुरावा- काही सरकारी
सेवा किंवा सुविधांसाठी, तुम्हाला तुमची जन्मतारीख प्रमाणित करणारे दस्तऐवजही द्यावे
लागतील. जर वर नमूद केलेल्या कागदपत्रांमध्ये जन्मतारीख नमूद केली असेल तर
स्वतंत्र जन्मतारखेचे प्रमाणपत्र आवश्यक नाही. आणि तसे नसल्यास, आपल्याला
मान्यताप्राप्त हॉस्पिटल किंवा सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेला जन्म पुरावा
द्यावा लागेल.
5) रिलेशनशिप सर्टिफिकेट: काही योजनांचा लाभ
मिळवण्यासाठी तुम्हाला कुटुंबाशी असलेले नाते सिद्ध करावे लागेल. जसे प्रधानमंत्री
आवास योजना, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री
सुरक्षा विमा योजना इ. त्याचप्रमाणे, काही योजनांमध्ये, लाभार्थींशी
संबंध सिद्ध करणे बंधनकारक आहे, जसे की पीपीएफ खाते किंवा सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पालक
होणे.
6) फोन नंबर आणि ईमेल आयडी: जेव्हा ती व्यक्ती
समोर नसते, तेव्हा त्याच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी फोन नंबर आणि
ईमेल आयडीचा वापर केला जातो. ओटीपी (वन टाइम पासवर्ड — वन टाइम
पासवर्ड) तुमच्या KYC दस्तऐवजासह प्रविष्ट केलेल्या फोन नंबर किंवा ईमेल आयडीवर
पाठविला जातो.
eKYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
eKYC प्रक्रियेसाठी कोणत्याही सेवा किंवा वस्तू प्राप्त करण्यासाठी खालील चरणांमधून जाणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम, एखादी व्यक्ती सेवेसाठी अर्ज करते. जसे मोबाइल सिमकार्ड
मिळवण्यासाठी किंवा नवीन बँक खाते उघडण्यासाठी. हे offline असो किंवा online.
सेवा प्रदान करणारी कंपनी (service provider ) निश्चित कलावधीत
दिलेल्या व्यक्तीच्या आधारद्वारे ओटीपी, बायो-मेट्रिक पडताळणी इत्यादींच्या मदतीने
तपशीलाची (नाव, पत्ता, वय, जन्मतारीख इ.) माहिती प्राप्त करते.
Ekyc करताना सेवा देणारी कंपनी UIDAI कडे आधार नंबर
पाठवते आणि तेथून नाव, पत्ता, वय, जन्मदिनांक confirm करते. UIDAI (Unique
Identification Authority of India) ही एक अशी संस्था
आहे जी, आधार क्रमांक नागरिकांना देते आणि नागरिकांची सर्व माहिती सुरक्षित ठेवते.
तसेच UIDAI कडे तुमची ओळख व्हावी ह्यासाठी ती OTP द्वारे आधार नंबरची
सुरक्षितरित्या माहिती प्रदान करते. जर तुम्ही तीच व्यक्ती असाल ज्यांचा आधार
क्रमांक दिला गेला असेल तरच तुम्ही तो ओटीपी भरू शकाल. ओटीपी टाकताच तुमची ओळख
योग्य सिद्ध होते.
तुमच्या ओळखीची खात्री होताच, तुम्ही सेवा
वापरण्यास सक्षम आहात. अशाप्रकारे, eKYC च्या मदतीने संपूर्ण
प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होते.
Importance of Kyc In Marathi – KYC चे महत्व काय?
केवायसी प्रक्रिया ही बँक आणि इतर कंपनीसाठी खूप आवश्यक आहे. तसेच ते आपल्यासाठी देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण, भविष्यात जर कोणी आपल्या नावाने बनावट कारवाई करत असेल. तर त्याला पकडण्यात kyc मुळे मदत होईल.
जेव्हा एखाद्या कंपनीकडून किंवा बँकेकडून ग्राहकाला आर्थिक
सेवा दिली जाते, तेव्हा त्याला ओळखपुराव्यासाठी केवायसी फॉर्म वापरला जातो.
केवायसी हा असाच एक दस्तऐवज आहे, जो बँकिंग प्रक्रियेचा एक आवश्यक आणि महत्त्वाचा भाग असल्याचे
म्हटले जाते. याने आर्थिक फसवणूक होण्याचा धोका सहज कमी करता येतो.
तर मित्रांनो, मला आशा आहे की kyc meaning in marathi ह्याविषयी आपल्याला माहिती मिळाली असेल. आपल्याला ह्या संबंधित काही माहिती हवी असेल तर आपण मला comment करून विचारू शकता. मी तुमच्या comment चे उत्तर नक्की देईल. आपल्या मित्रांसह केवायसी म्हणजे काय? Kyc Meaning In Marathi | kyc full form in Marathi हे लेख शेअर करा. आपल्याला या लेख कसा वाटला हे देखील कॉमेंटद्वारे नक्की कळवा.
ConversionConversion EmoticonEmoticon